Home अहेरी कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकामासाठी मदत करणार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार...

कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकामासाठी मदत करणार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आश्वासन

40
0

अहेरी : तालुक्यातील कन्येपल्ली येथील समस्त नागरिकांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथील आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन येथील विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली आहे.

चर्चा दरम्यान कन्येपल्ली येथील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होती.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतो.या अडचण लवकरत लवकर दूर करण्यात यावी म्हणून कन्येपल्ली येथील समस्त नागरिकांनी अजयभाऊंन कडे मागणी केली आहे.

त्यावेळी अजयभाऊंनी कन्येपल्ली नागरिकांना सांगितले की”आपल्या माता मंदिर बांधकाम साठी मदत करू म्हणून आश्वासन दिले आहे.त्यावेळी समस्त कन्येपल्ली नागरिकांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी उपस्थित नितिन कोडापे उपसरपंच,मल्लया बोमेन माजी उपसरपंच,मल्लाया गेडाम,प्रभाकर कोडापे,शंकर गेडाम,नागेश कोडापे,दिनेश वडकवार,कमलाकर गट्टीवर,तिरुपती कोंकावर,दुर्गाय्या कोडापे,राकेश कोडापे,जगदीश कोडापे,सुनील सडमेक,शंकर अपलवारसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here