अहेरी : मेडपल्ली येथील विशाल गुट्टा यांनी काल विष प्राशन केल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविले.तेथे उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेह पोस्टमॉर्टेमनंतर स्वगृही नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था न झाल्याने अडचण निर्माण झाली.ही माहिती मिळताच मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी संपर्क साधला.परिस्थितीची गंभीरता ओळखून अजयभाऊंनी विलंब न करता गडचिरोली येथील कार्यकर्ते शिवराम पुल्लूरी व मिथुन देवगडे यांना तातडीने वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
त्यांच्या तत्पर पुढाकारामुळे काही क्षणांतच वाहनाची व्यवस्था करण्यात आली आणि मृतदेह गडचिरोलीहून मूळगावी तुमिरकसा येथे हलविण्यात आला.
स्थानिकांनी या संवेदनशील प्रसंगी दाखवलेल्या तत्पर मदतीबद्दल अजय कंकडालवार व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.
Home मुख्य बातम्या तुमिरकसा ग्रामस्थाला विषप्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू ; वाहन व्यवस्थेअभावी अडचण – अजय कंकडालवार...





