अहेरी : तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या काटेपल्ली येथे पोचम्मा देवीची बोनलू व सामूहिक विवाह माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते उत्सहात संपन्न झालं आहे.
काटेपल्ली येथे माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होते.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतात.
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी देवलमरी व काटेपल्ली गावात दौऱ्यावर गेले होते.दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भासत होते सांगितले.गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन यांनी शासन कडून आताचे आता माता मंदिर साठी निधी उपलब्ध होत नाही.मात्र मी स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले.
सदर बांधकाम ही पूर्ण झाले असल्याने.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विविध पूजा अर्चना करून रीतसर उदघाटन करण्यात आले.
त्यावेळी नागरिक अजयभाऊ कंकडालवार यांना आभार म्हणले.ठिकाणी गावकर्यांकडून पोचम्मा देवीची बोनालू कार्यक्रमाही आयोजित केले आहे.होणाऱ्या बोनालू कार्यक्रमाला संपूर्ण खर्चा अजय कंकडालवार कडून देण्यात आली,तसेच कार्यक्रमत एक जोडप्यांची सामूहिक विवाह सोहळा पार पडले,अजय कंकडालवार यांचाकडून नवा दामपात्यांना विविध वस्तू देऊन शुभ आशीर्वाद देत पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिले.
यावेळी लक्ष्मण कन्नाके सरपंच,हरीश गावडे उपसरपंच देवलमरी,महेश लेकूर ग्रामपंचायत सदस्य,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,संजय गोंडे माजी सदस्य देवलमरी,ग्रामपंचायत अधिकारी दुर्वे मॅडम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,श्रीनू राऊत,जगन्नाथ मडावी माजी उपसरपंच देवलमरी,विलास आत्राम,लालशही आत्राम,इस्पत गावडे माजी सरपंच,गणेश मडावी,दुर्गा तलांडे,सत्यम तलांडे,दिलीप कोडापे,लक्ष्मण सडमेक,लक्ष्मण आत्राम,सुधाकर लेकूर,साई पूलगाम,नागेश राऊत,शंकर आत्राम,सुधीर बमानकर,शिवदास बामनकर,मुन्ना झाडे,तालुशीराम चालूरकर,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गे यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते,प्रतिष्ठित नागरिक तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते माता मंदिरचे उदघाटन….काटेपल्ली येथे बोनालू कार्यक्रम...





