Home मुख्य बातम्या ताडगाव परिसरातील ज्वलंत समस्याचे विधानसभा विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार याना निवेदन

ताडगाव परिसरातील ज्वलंत समस्याचे विधानसभा विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार याना निवेदन

44
0

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे भामरागड तालुक्यातील नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा ताडगाव येथील अनेक ज्वलंत समस्याचे निवेदन आज आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्फतीने माजी कॅबिनेट मंत्री – महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी निवास्थानी येते भेट घेऊन निवेदन देण्यात आली आहे.

निवेदनात विविध मागणी केले असून मुख्यत्वे ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे रूपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात करावे,मौजा ताडगाव येथे कोणतेही राष्ट्रीय कृत किंवा खासगी बँक ची शाखा सुरू करावी. ताडगावं येथॉल बिरसा मुंडा क्रीडांगण चे दूरस्ती व देखभाल करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे.तसेच भामरागड नगरपंचायत क्षेत्रातील लोकांना आखीव पत्रिका तयार करून देऊन प्रॉपर्टी कार्ड काढून देण्यात यावे.असे विविध मागण्याचे निवेदन त्यांच्या स्वगृही ब्रम्हपुरी जाऊन दिले.

यावेळी निवेदन देतांना सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी,वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,लालसू आत्राम पंचायत समिती माजी उपसभापती भामरागड,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,राजू वड्डे,अजय,गजानन उईके,अर्जुन मंडल,जाधव हलदार,समीर राय,संतोष परसा,स्वप्नील वेलदी,जगदीश कोकुमुखीवार,तापेश हलदार,रमेश बोलमपाल्लीवार,कुमार सईला,रोहन नर्तमा,शिवराम पुल्लूरी,मिथुन देवगडे,सचिन पंचार्यासह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here