Home मुख्य बातम्या फुकट नगर जलमय ‘मुसळधार पावसाने आल्लापल्लीतील जनजीवन विस्कळीत : जिल्हा परिषद शाळेत...

फुकट नगर जलमय ‘मुसळधार पावसाने आल्लापल्लीतील जनजीवन विस्कळीत : जिल्हा परिषद शाळेत तातडीचे पुनर्वसन

19
0

आल्लापल्ली : मुसळधार पावसाने आज आल्लापल्ली शहरात थैमान घातले.विशेषतः फुकट नगर वसाहतीत पावसाचे पाणी घरात घुसल्याने अनेक कुटुंबे घराबाहेर रस्त्यावर येण्याची वेळ आली.नागरिकांचे घरातील साहित्य भिजले असून जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व हनमंतू मडावी जिल्हा अध्यक्ष, आदिवासी सेल यांनी तात्काळ प्रतिसाद देत आल्लापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जूभाऊ पठाण यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्त कुटुंबांच्या तातडी पुनर्वसनाचे आदेश दिले.

त्यानुसार अज्जूभाऊ पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा,आल्लापल्ली येथे नागरिकांसाठी सुरक्षित निवारा, जेवणाची आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची व्यवस्था केली.या वेळी काँग्रेस आविसचे कार्यकर्ते प्रशांत सरकाटे, विशाल भाऊ तोडसाम, जावेद शेख आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या तात्काळ मदतीचे व कार्यकर्त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.दरम्यान, अजूनही काही भागांत पाणी साचल्याने नागरिक भयभीत असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here