Home सिरोंचा सिरोंचा येते काँग्रेस /इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांचे प्रचार कार्यालय उदघाटन

सिरोंचा येते काँग्रेस /इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांचे प्रचार कार्यालय उदघाटन

43
0

सिरोंचा : काँग्रेस इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डाॅ.नामदेवराव किरसान साहेबांचा विजयसाठी काँग्रेस इंडिया महाविकास आघाडी मधील पदाधिकारांनी कामाला लागले आहेत.काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस इंडिया महाविकास आघाडीचे लीड देण्यासाठी ठिकठिकाणी प्रचारदौऱ्या करत आहे.

आज महाराष्ट्रातील दक्षिण भागातील शेवटचा टोकावार असलेल्या सिरोंचा येथील उमेदवार किरसान साहेबांचा प्रचार दौऱ्यासाठी कार्यालय उदघाटन करण्यात आली आहे.सदर कार्यालयचे उदघाटन काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पाडले आहे.

त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार सांगितले की’ येणाऱ्या भविष्यात काँग्रेस पार्टी सत्तेत आल्यास आपल गाव आणि संपूर्ण जिल्हाचे विकास होऊ शकते.एप्रिल 19 तारीखेला आपण सर्वांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हा समोरील बटण दाबून डॉ.नामदेव किरसान साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा म्हणून आपआपल्या गावातील प्रत्येक वेक्तीना सांगून प्रचार करण्यात यावी अशी कार्यालय उदघाटन वेळी इंडिया – महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

उदघाटन प्रसंगी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,काँग्रेसनेते बानय्या जनगाम,सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी,महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडे,माजी सभापती सुरेखाताई आलम,माजी सभापती भास्कर तलांडे,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे उपसरपंच तिरुपती दुर्गम,माजी सभापती सुगणाताई तलांडे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष फाझील पाशा,उपाध्यक्ष सागर मूलकाला,सिरोंचा बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सरपंच कुळमेथे साहेब,महिला काँग्रेस अध्यक्ष शेख दीदी,नगरपंचायत माजी नागराध्यक्ष मारिया दीदी,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगली,सरपंच अजय आत्राम,सरपंच सुरज गावडे,सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सिजाता येलम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,श्रीनिवास दुर्गम,लक्ष्मण बोल्ले,गणेश राच्चर्लावर,विजय तोकाला, महेश तलांडे,सागर कोट्टारी,आनंद पाशा,माजिद आली,सचिन पंचार्य,राकेश सडमेकसह परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here