Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंधारलेल्या...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंधारलेल्या वाटा नाटकांचे उद्धघाटन

52
0

अहेरी : तालुक्यातील मौजा पेरमिली येथे दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी अंधारलेल्या वाटा या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.या नाटकांचे उद्धघाटन आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी नाटकाच्या उद्धघाटन प्रसंगी नागरिकांना संबोधन करताना म्हणाले की”नाटक म्हणजे जिवंत,मृत,पौरानीक ऐतिहासिक किवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली. बहूद्या संवादात्मक,अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मकती असू शकते.नाटकामध्ये शब्दसंहिता,त्यांच्याप्रमाणे कथानक,त्यात असलेल्या विषयांचा तपशील,संवाद,पदे,वाद्यासंगीत नर्त्या,संघर्ष,उत्कंठा,नेपथ्य,वेश,रंगभूष,प्रकाशयोजना,अभिनय आणि कथानक असू शकते.कलाकारांनी नाटकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाला चालना देत समाज प्रबोधन करावे असे ते म्हणाले.

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी,पेरमिली ग्रामपंचायतचे सरपंच किरणताई नैताम,माजी सरपंच प्रमोद आत्राम,वांगेपली ग्रा.प.सरपंच दिलीप मडावी,मेडपली ग्रा.प.सरपंच निलेश वेलादी,अहेरी नगरपंचायतचे नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,अहेरी काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार हकीम, रज्जाकभाई पठाण,ग्राप सदस्य सपनाताई बंडंमवार,रजिताताई मुळावार,शशिकला आत्राम,कविश्र्वर चंदणखेडे,माजी ग्रा.प.सदस्य विश्वेश्वरराव कोंडागुर्ले साजन् गावडे, शिक्षक महेश दहागावकर,दलसू आत्राम उपसरपंच,पत्रकार आशिफ पठाण,कैलास झाडे,येरमनारचे उपसरपंच विजय आत्राम,पेरमिलीचे उपसरपंच सुनील सोयाम,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,गणेश औतकर,बंडू आत्राम स्वप्नील मडावी,नरेंद्र गर्गम,सचिन पांचर्या,प्रमोद गोडशेलवारसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here