सिरोंचा : नगर पंचायतमधील घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराचे बिल मंजुरीसाठी न.पं.उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी अडवणूक करत लाच मागितल्याचा आरोप कंत्राटदार अडपा मल्लय्या राजम यांनी केल्यानंतर बबलू पाशा यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. आपल्याकडून खंडणी म्हणून २० लाखांची मागणी कंत्राटदाराने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या सर्व आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोप-प्रत्यारोपाने सिरोंचा नगर पंचायतमधील राजकारण ढवळून निघाले आहे.दिनांक २२ जुलै २०२३ रोजी कंत्राटदार अडपा मल्लय्या राजम आणि सत्यनारायण सांबय्या बुरोवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सिरोंचा नगरपंचायत कार्यालयाविरुध्द पैसे मागत असल्याचा आरोप करून २४ जुलै २०२३ पासून उपोषणावर बसणार असल्याचे सांगितले. पण ते उपोषणाचे नाटक करून आपल्यालाच 20 लाखांची खंडणी मागत असल्याचा आरोप न.पं.उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.अडपा राजम यांच्याकडून मी १० डिसेंबर २०२० रोजी मैत्रीच्या व्यवहारातून १५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. ती रक्कम २६ जून २०२१ रोजी धनादेश क्र.१३२९८५ अन्वये परतफेड केली आहे. त्यानंतर हा व्यवहार पूर्ण झाल्याचे आणि आता कोणतीही थकबाकी नसल्याचे राजम यांनी लिहून दिले होते.या व्यवहाराचा घनकचरा व्यवस्थापन कामासोबत कुठलाही संबंध नाही.असे असताना अडपा मल्लय्या राजम आणि सत्यनारायण बुर्रावार यांनी खंडणी वसुलीसाठी माझ्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप केल्याचे बबू पाशा यांचे म्हणणे आहे.याप्रकरणी पोलीस विभागाकडून आधीच चौकशीही झाली असून कोणताही पुरावा नसल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण बेदखल केल्याचे पाशा यांनी सांगितले.सत्यनारायण बुर्गावार यांचे बाजारवाडीतील अतिक्रमण हटविल्यामुळे त्याचा मोबदला म्हणून माझ्याकडून १५ लाखांची मागणी करित आहे.त्याचप्रमाणे ते नगर पंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याची तक्रार नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी मला व वरिष्ठ कार्यालयाला दिली असल्याचे बबलू पाशा यांचे म्हणणे आहे.सावकारीतून अनेकांची पिळवणूक अडपा मल्लय्या राजम हे तेलंगाणा राज्यातील रहिवासी असून सिरोंचा शहरात अनेक वर्षांपासून सावकारी करतात.गरजवंताला व्याजाने पैसे दिल्यानंतर मनमर्जीने व्याज आकारणे,मालमत्ता जप्त करणे,आर्थिक पिळवणूक करणे अशा व्यवहारामुळे सिरोंचा शहरातील अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याचा आरोप बबलू पाशा यांनी केला आहे.याकरिता अडपा मल्लय्या राजम व सत्यनारायण सांबय्या बुर्रावार यांचेविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन त्वरीत कारवाई करण्यात यावी.अन्यथा मी आमच्या गटातील नगरसेवक व कार्यकर्तेसह उपोषणाला बसणार आहे.अशी सिरोंचा नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी सिरोंचा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे
Home मुख्य बातम्या उपोषणाच नाव खाली नगरपंचायत उपाध्यक्ष यांना 20 लाखाची खंडणी मांगत असल्याचा बबलू...