Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा प्रमुख उपस्थित कोपरअल्ली येथील हळदी कुंकू कार्यक्रम...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा प्रमुख उपस्थित कोपरअल्ली येथील हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

2
0

अहेरी : तालुक्यातील कोपरअल्ली येथे झाडे समाज कोपरअल्ली,मकर संक्रांतीच्या निमित्याने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले आहे.

आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी यांनी उपस्थित होत कार्यक्रमला मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमला आर्थिक मदतही करण्यात आली.

सर्व प्रथम अजय कंकडालवार यांनी सावित्रीबाई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महिला ही अबला नसून सबला आहे.आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते.संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे.

आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी अजय कंकडालवार यांचाकडून विविध उपक्रम राबवित आहोत.महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीच्या बाहेर येऊन काम करावे महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे.हळदी कुंकूवाचा कार्यक्रमात अजय कंकडालवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील शेकडो महिलांनी हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here