Home सामाजिक इंदाराम ग्रामपंचायत येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी : उत्कृष्ट कार्य केलेल्या...

इंदाराम ग्रामपंचायत येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी : उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप

74
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील २७,८९६ ग्राम पंचायतीमधील सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या ५५,७९४ कर्तबगार महिलांच्या गावांमध्ये सन्मान करण्यात यावी अशी सूचना महिला व बालविकास विभागाकडुन देण्यात आली त्यांअनुषंगाने इंदाराम ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्सवात पार पडले.त्यानिमित्त इंदाराम ग्रामपंचायत अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सरपंच सौ. वर्षाताई पेंदाम व इंदाराम येतिल आशावर्कर सौ. पुष्पाताई आत्राम यांना इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर ग्रामस्तरीय पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी इंदाराम ग्रामपंचायतचे सदस्य श्री.गुलाबराव सोयाम,के.एस. किरंगे सचिव, प्रल्हाद पेदाम,रविंद्रनाथ वाघडे,रोशन सामनावर ग्रामपंचायत कर्मचारी,शरद आलामसह गावातील नागरिक व सदस्य कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here