अहेरी : तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मुत्तापूर येथील रहिवाशी अनंतू वारलू मडावी ( वय 55 वर्षे ) यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दिनानदीत नेहमी प्रमाणे आजही मच्चीमार करण्यासाठी गेले होते,परंतु तिथून सदरहू व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.मासेमारी करतांना पाण्यात तोल गेल्याने सदरहू व्यक्ती वाहून घेल्याची शंकाही व्यक्त होत आहे.अहेरी भागात मागील तीन चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने दिना नदी भरून वाहत आहे.
अनंतूची रोजची घरी येण्याची वेळ होत आहे म्हणून त्यांचे नातेवाईक व गावकरी शोध घेण्यासाठी दिना नदीकडे जाऊन रात्री पर्यंत शोध घेतले मात्र कुठेही दिसून आले नाही. दिना नदी जवळूनच मुत्तापूर येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना भ्रमनध्वनी द्वारे घटनेची माहिती दिले असता कंकडालवारांनी तात्काळ घटना स्थळी पोहचुन बेपत्ता इसमाबद्दल तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोरे मॅडम व इतर अधिकाऱ्यांनी नदीजवळ दाखल झाले. बेपत्ता इसमाची बोटीने शोध घेणार असल्याची माहिती दिले.अनंतू मडावी हे नदीत वाहून गेले कि,सुखरूप आहेत? हे मात्र अद्याप कळलेलं नाही.
दिना नदी घटनास्थळी जाऊन बेपत्ता झालेल्या इसमाची माहिती जाणून घेतांना कंकडालवार यांचे समवेत श्रीनिवास आलम,गणेश चौधरी,प्रवीण मडावी,रवीजी मडावी,अशोक चेन्नूरवार,अजय मडावी,यादव तलांडे,मधुकर सिडाम,प्रकाश सिडाम,चांदेकर मडावी,बाबुराव मडावी,राम आत्राम,बंडू पेंदाम,सुनील मडावीसह गावकरी व नातेवाईक उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या मासेमारीसाठी गेलेल्या मुत्तापूर येथील अनंतू मडावी बेपत्ता…घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार...