एटापल्ली : तालुक्यातील कसनसूर येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कसनसूर येथे आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक तथा माजी जि.प. सदस्य सैनूजी गोटा यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न झालं.
टीडीसी अंतर्गत येणारे कसनसूर परिसरातील शेतकरी बांधवांच्या समस्या लक्षात घेऊन तात्काळ धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे सभापती लालसु नरोटे, सुधाकर गोटा, सुनील मडावी, चित्तरंजन दास, नरेश गावडे, बारसू उसेंडी टीडीसी चे कर्मचारी व गावचे पाटील भूमिया सह कसनसूर केंद्रातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
तसेच यावेळी सभापती लालसु नरोटे यांच्या हस्ते आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सख्या भावाचा पराभव करून आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक म्हणून बहुमताने निवडून आल्याबद्दल सैनू गोटा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी निक्की पुंगाठी, सुमित गोटा सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





