Home आलापल्ली दहीहंडीचे थर पाहण्यासाठी आलापल्लीत उसळली नागरिकांची गर्दी

दहीहंडीचे थर पाहण्यासाठी आलापल्लीत उसळली नागरिकांची गर्दी

30
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आलापल्ली येथे मंगळवारी प्रेन्डस क्रिडा व संस्कृतीक मंडळ तर्फे दहीहंडीचे कार्यक्रम आयोजन केले आहे.अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात गोविंदा पथकांनी सहभागी होऊन दहीहंडी फोडली.

स्थानिक वीर बाबुराव चौक आलापल्ली मैदानावर कान्हा मटकीफोडा कार्यक्रमाची कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन पार पडली आहे.तसेच प्रथम क्रमांकाच्या पथकाला काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 55555/- रु देण्यात आली आहे.

त्यावेळी दहीहंडी स्पर्धेठिकाणी भाविक तसेच नागरिकांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या कडून महाप्रसाद कार्यक्रमाही ठेवण्यात आली.दहीहंडीचे थर पाहण्यासाठी आलापल्लीत उसळली नागरिकांची गर्दी त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी समस्त जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुभेच्छा देऊन महाप्रसाद कार्यक्रमाला सुरवात केली.

या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.विशेष अतिथी म्हणून आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच शंकर मेश्राम – नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे – उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे – पोलीस निरीक्षक अहेरी दशरथ वाघमोडे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार – नागेपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोज किशोर दुर्गे – व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे होते.

यावेळी मंचावर मंदाताई कंकडालवार,अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,माजी सभापती गीता चालूरकार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राजक पठाण, अज्जू पठाण,किशोर दुर्गे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,ग्रामपंचायत सदस्य शारदा कडते,ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख,तंटामुक्ती अध्यक्ष दीपक तोगरवार,स्वप्नील मडावी,परमेश्वर आत्राम,भाग्यश्री बेझलवार,आनंद दहागावकर,मिलिंद खोंड,नरेश गर्गम,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवार,कोरेत ताई,गागोरी काका,किशोर सडमेक,चंद्रकांत बेझलवार,इमरान खानसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here