अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा शुभहस्ते 26 जानेवारी रोजी शिव मंदिर चौक,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथे ध्वजारोहन संपन्न झाला.
त्यावेळी काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी 77 व्य प्रजासत्ताक दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम,देशभक्तीपर नृत्य,संगीत आणि विचारपूर्ण भाषणे यांमधून देशाबद्दलची त्यांची निष्ठा,प्रेम आणि आदरभाव स्पष्टपणे जाणवला.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि सादरीकरण पाहून अत्यंत समाधान वाटले.
प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून, तो घटनात्मक मूल्ये, नागरिक हक्क आणि सामाजिक कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे.भारतीय नागरिक म्हणून देशाने आपल्याला दिलेल्या संधी,अधिकार आणि स्वातंत्र्याची जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी परत देण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.
देशाच्या सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी आणि प्रगतीसाठी सदैव सज्ज राहून,आपल्या कर्तृत्वातून राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे,असे आवाहन अजय कंकडालवार यांनी केले.
यावेळी शिक्षक वृद,ग्रामपंचायत सरपंच – उपसरपंच व सदस्य,गावातील समस्त नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





