अहेरी : एटापल्ली पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामसेविकेवर अतिप्रसंग करण्याचं प्रयत्नासह भ्रष्टाचाराचे प्रकरण दडपण्यासाठी अहेरी येथील दोघांनी दहा लाख रुपये खंडणी मागितल्याची लेखी तक्रार एका महिला ग्रामसेविकेने अहेरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे.या प्रकरणाची योग्य चौकशी करून अहेरी येथील दोघं खंडणी बहाद्दरांवर अनुसूचित जाती-जमाती कायद्यांन्वये कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणीही केली आहे.
महिला ग्राम सेविकेनी अहेरी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार ,तक्रारकर्त्या महिला ग्रामसेविका यापूर्वी अहेरी तालुक्यातील खमनचेरु येथील ग्रामपंचायतीमध्ये सन २०११ ते २०२२ पर्यंत कार्यरत होती नंतर त्यांची बदली एटापल्ली येथील पंचायत समिती येथे झाल्याने सध्या एटापल्ली पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत.अहेरी येथील रवी रत्नय्या नेलकुद्री व प्रशांत नामनवार या दोघांनी महिला ग्रामसेविका खमनचेरु येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकाळातील माहिती सध्याचे ग्रामसेवकाडून माहिती अधिकाराअंतर्गत सन २०११ ते २०२२ मधील मागितली व या माहितीचा आधार घेऊन त्यांनी याची वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे होत.
परंतु तसे न करता रवी नेलकुद्री व प्रशांत नामनवारांनी तुमच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाले असून तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये देऊन एक नवीन रुग्णवाहिका घेऊन द्या असे महिला ग्रामसेविकाला वारंवार पैशाची मागणी करीत नाही दिली तर आम्ही तुमच्या विरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करू व सोशल मीडियावर बदनामी करू असे धमकी देत होते.आणि या दोघांनी जनजागृती नावाचं वाटसप गृपवर ग्रामसेविकेविरुद्ध रोज मॅसेज पोस्ट करून नाहक बदनामी करणे सुरूही केले.
दिनांक ५ नोव्हेंबर रोजी आपल्या मुख्यालयी कर्तव्यावर अहेरी येथून एटापल्ली कडे जात असताना जंगल परिसरातील एलचील गावाजवळ रवी नेलकुद्री व प्रशांत नामनवार या दोघांनी रस्त्यात अडवून पैशाची मागणी करत महिला ग्रामसेविकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.यात महिला ग्रामसेविका यांनी आपली दुचाकी वाहन चालूच ठेवून या रस्त्यावरून एक चारचाकी वाहन जात असल्याचे आडोस घेत महिला ग्रामसेविका तिथून कसे बसे निघून गेल्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचं प्रयत्न फसल्याचे तिचे म्हणणे आहे. महिला ग्रामसेविका एटापल्ली वरून परत येऊन अहेरी येथील दोघांविरोधात अहेरी येथील पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
महिला ग्रामसेविकेची या तक्रारी विषयी अहेरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना विचारणा केली असता,आपल्या पोलिस स्टेशनमध्ये दिनांक ५ नोव्हेंबर रोजी एका महिला ग्राम सेविकेची तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई संबंधितांवर करण्यात येईल अशी माहिती दिली.
Home मुख्य बातम्या अहेरी येथील भाजप नेत्यांची महिला ग्रामसेविकेला अतिप्रसंग करण्याचं प्रयत्नासह दहा लाख रुपयांची...