अहेरी : तालुक्यातील चुटूगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत टिकेपल्ली गावात महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त २६ फेब्रुवारीला ‘बंधन तुटले मंगळसूत्राचे’ हे नाटक सादर करण्यात आले.या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.महाशिवरात्री यात्रेनिमित्त
श्री.शिवशंकर मंदिर प्राणहिता नदी घाट टिकेपल्लीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
जय शिवराय दंडार मंडळ मल्लेझरीच्या वतीने ‘बंधन तुटले मंगळसूत्राचे’अर्थात,नवऱ्याच्या हातून बायकोचा खून या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.नाटकाचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतु मडावी होते.अध्यक्ष म्हणून चुटुगुंटाच्या सरपंच साधना मडावी,उपसरपंच सुरेश आत्राम,माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,शिंदेसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे,गौरव बाला, व्यंकटेश धानोरकर,कालिदास कुस्नाके,राजू दुर्गे,अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम,गणेश चौधरी मारोती नैताम,बाबुराव शेडमाके आदी उपस्थित होते.
यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष अजय नैताम,उपाध्यक्ष भीमराव कोरेत,सचिव तुळशीराम मडावी,कोषाध्यक्ष मारोती नैतामसह परिसरातील भाविक तसेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते,गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी टिकेपल्लीतील महाशिवरात्री यात्रेत नाटकाची मेजवानी : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते...