अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे भव्य नवनिर्माण मंदिरातील प्रभु श्रीरामाचे प्रतिष्ठापना महोत्सव निमित्त आज इंदाराम हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या श्रीरामाचे प्रतिष्ठापना महोत्सव कार्यक्रमाला इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभवभाऊ कंकडालवार परिवारांनी उपस्थित राहून प्रभु श्रीरामाचे विविध पुजा अर्चा करून दर्शन घेतले
यावेळी प्रभु श्रीरामाचे प्राण प्रतिष्ठा निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसाद इंदाराम ग्राम पंचायतचे उपसरपंच वैभव भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते.या कार्यक्रमाला गावातील नागरिक व गुरूमाऊली भजन मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी श्री राम प्राण प्रतिष्ठापना निमित्त उपसरपंच वैभवभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप