Home अहेरी वृद्धांच्या पेन्शनमध्ये अडथळे; अजयभाऊ कंकडालवारांनी तातडीने घेतला पुढाकार

वृद्धांच्या पेन्शनमध्ये अडथळे; अजयभाऊ कंकडालवारांनी तातडीने घेतला पुढाकार

7
0

अहेरी : शासनाच्या नवीन नियमावलीमुळे अनेक वृद्ध नागरिकांना त्यांच्या दरमहा मिळणाऱ्या ₹१५०० पेन्शनमध्ये अडचणी येत असून, त्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनात मोठे संकट ओढवले आहे. चुली बंद पडण्याची वेळ आलेल्या या वृद्ध महिला व पुरुषांनी आपली व्यथा काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे व्यक्त केली.वृद्ध नागरिकांच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत,अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळ न दवडता तहसील कार्यालय अहेरी गाठले.त्यांनी तेथील निराधार शेक्शनच्या अधिकारी व नायब तहसीलदार मा.सुरपाम मॅडम यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली.यावेळी त्यांनी संबंधित विभागांना सूचित करत म्हटले की, प्रत्येक वृद्धाच्या अडचणींची तातडीने चौकशी करावी. तसेच, संबंधित साजेतील पटवारी व कोतवाल यांनी गरजू वृद्धांचे कागदपत्रे तात्काळ गोळा करून त्यांचे प्रलंबित प्रस्ताव निराकरण करावेत, जेणेकरून पेन्शनची रक्कम नियमित मिळू शकेल.या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अनेक वृद्धांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कंकडालवार यांचा हा लोकाभिमुख निर्णय कौतुकास पात्र ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here