भामरागड : तालुक्यातील परायणार गावातील संजना सुभाष महाका (वय 15) या युवतीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रेफर करण्यात आले.मात्र दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी संजनाचा मृत्यू घोषित केला.
महाकाल कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असून,मृतदेह गावापर्यंत नेण्यासाठीही त्यांना वाहतुकीची मोठी अडचण भासत होती.याबाबत लक्ष्मीकांत भोगामी यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली.
त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार कामानिमित्त बाहेर होते.मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांना त्वरित रुग्णालयात पाठवले.गोडसेलवार यांनी रुग्णालयात जाऊन महाका कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
माणुसकीचे भान राखत,अजयभाऊंनी तातडीने खाजगी चारचाकी वाहन उपलब्ध करून देत मृतदेह गावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली.या सहकार्यामुळे गरिब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून,कुटुंबीयांनी अजयभाऊ व गोडसेलवार यांचे आभार मानले आहेत.