सिरोंचा : तालुक्यातील वेंकटापूर(बामणी) येथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते स्व.समय्या कुळमेथे यांचे दिनांक 19 जूनला आकस्मिक दुःखद निधन झाले होते.29 जूनला त्यांच्या तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.आयोजित तेरवी कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून कुळमेथे कुटुंबाचा सांत्वन केले.
यावेळी बानाय्या जनगम तालुका अध्यक्ष आविसं सिरोंचा,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,अशोक येलमुले माजी सरपंच,गणेश रचावार,अजय आत्राम सरपंच,सूरज गावडे सरपंच गरकापेठा,सरपंच दिवाकर कोरेत,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,तशू शेख,लिंगा वेलादी माजी सरपंच,प्रमोद गोडसेलवार, करण भुपेलीवार,सचिन पांचार्या,रोहन जनगम,शिनू गोडाम,राजेश पाडाला,संतोष पडाला,समय्या अल्लूरी,गणेश नैतम,शिनू कुलमेथे,नागेश मोहर्ले,नरेश कोटरगे,रतन आत्राम,नागेश आत्राम,राजेश सिडामसह सिरोंचा तालुक्यातील आजी माजी सरपंच – सदस्य,आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होत.