Home अहेरी अंगणवाडीतील लाभार्थींसाठी स्थानिक आहार पूर्ववत सुरु करा : अजय कंकडालवार यांना निवेदन...

अंगणवाडीतील लाभार्थींसाठी स्थानिक आहार पूर्ववत सुरु करा : अजय कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी

41
0

भामरागड व एटापल्ली नगर पंचायत हद्दीत येत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आविसं काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष जि.प.गडचिरोली तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले.

तालुक्यातील काही गाव नगर पंचायत हदी मध्ये येत असून तरी आम्हाला महिला बचत गटातर्फे आहार शिजवून देण्यात येत आहे. तरी ते आहार भामरागड , एटापल्ली मध्ये शिजवुन प्रत्येक अंगणवाडी केंद्राला वाटप करणार आहे असे म्हटले जात आहे. आणि भामरागड , एटापल्ली वरून आहार शिजवून वेळेवर अंगणवाडी केंद्रात कधी पोहचणार तरी आम्हाला मान्य नाही कारण भामरागड एटापल्ली मधुन १३ ते १५कि.मी अंतरावर अंगणवाडी केंद्र आहेत. तिथून शिजवलेला आहार आमच्या अंगणवाडी केंद्रात पाठविण्यात येणार असून ते आम्हाला मान्य नाही तरी पण आहार एकदा मिळणार आहे.

त्या आहारात मुरमुरेचे लाडू किंवा खिचडी ते पण एकदाच त्या एक आहारावर ४ तास बालके राहु शकत नाही. करीता आम्हाला ग्रामिणला जश्या प्रकारे आहार मिळतो तश्या प्रकारे आहार आमच्या नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या अंगणवाडी केंद्राला पण मिळावा व तसेच गरोदर माता स्तनदा माता ते ६ वर्षाचे बालकांना (ए.पि.जे अब्दुल कलाम) आहार योजना पुर्ववत सुरू करून देण्यात यावा.किशोरवयीनमुलींना व गरोदर माता, स्तनदामाता यांना वेळेवर आहार मिळत नाही. कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले तर आम्ही अंगणवाडी सेविका जबाबदार राहणार नाही.

बचत गटा मार्फत आहार देण्यात येत असुन ते सरासरी बंद करून शहरी नगर पंचायत योजना व स्थानिक योजना अंतर्गत आहार अंगणवाडी केंद्रातूनच दिला जातो व त्या विषयक माहिती किंवा दस्तऐवज संबधीत माहिती अंगणवाडी सेविका यांच्या कडून घेतल्या जातात. अंगणवाडी मध्ये ०३ते ६.०६ते३ मुला/मुलींना आहार देण्यात येतो व शिक्षणही देण्यात येतो. करीता महिला बचत गटाच्या माध्यमातून आहारातून सेवा हि वेळेवर मिळत नसल्याने पालक वर्ग अंगणवाडी सेविका कडून अंगणवाडी केंद्रातूनच आहार शिजवून देण्यात यावा अशी मागणी होत आहे.अमृत आहार योजना व मुबलक सेवा फक्त मुख्यालयातुन देण्यात यावीं अशी मागणी भामरागड व एटापल्ली शहरी विभागीय अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी यावेळी भामरागड नगरपंचायतचे स्वच्छ्ता सभापती कविता येतमवार,महिला बालकल्याण सभापती तेजस्विनी मडावी,पाणी पुरवठा सभापती शशिरेखा आत्राम,अहेरीनगर पंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगाम,सोनी इरपा वाचमी अंगणवाडी सेवीका ए.केंद्र बेज्जूर,सोनी रामजी पुंगाटी मदतनीस अ.केंद्र बेझूर,
सुनंदा गोपिनंदा बावणे अंगणवाडी सेविका केंद्र ताडगाव,पोर्णिमा विजय चौधरी मदतनीस अ.केंद्र ताडगाव,मनिषा विजय पडालवार अंगणवाडी सेविका अ.केंद्र ताडगाव,नानस गंगाराम सलामे मदतनीस अ.केंद्र ताडगाव,मीनाक्षी जितेंद्र हबका अंगणवाडी सेविका ए. केंद्र कोयनगुडा,मितीबाई रामजी हबका मदतनीस ए. केंद्र कोयनगुडा,समिता श्रीपाद मेश्राम अंगणवाडी सेविका कोयनगुडा ए,जानू मालू कुडयामी मदतनीस अ.केंद्र भामरागड,चिन्नाबाई पोचुजी आलम अंगणवाडी सेविका अ.केंद्र भामरागड,शाहीन अमीन शेख मदतनीस अ.केंद्र भामरागडसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here