मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रडखडलेला आहे. सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरच चर्चा होऊ शकते. तसेच, सध्या राज्यातसह केंद्रातही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे समोर येईल. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची काल रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी माहिती बैठकीनंतर समोर आली आहे. त्यामुळे आजच्या एकनाथ शिंदेंचा दौराही महत्वाचा मानला जात आहे.
Home मुख्य बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग