सिरोंचा तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याची मागणी मा.जिल्हाधिकारी यांना मा.तहसीलदार सिरोंचा यांचे मार्फत करण्यात आले.सिरोंचा तालुक्यातील सामान्य जनतेचा वतीने व कांग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने, आपले लक्ष तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित व जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांकडे वेधावे असे आम्हाला वाटते. अनेक वेळा प्रशासनाकडे या समस्यांबाबत निवेदने सादर करण्यात आली.चर्चा करण्यात आली, परंतु अद्याप कोणतीही ठोस व दृश्यमान कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे कांग्रेस कमेटीचा वतीने निवेदन देण्यात आले.ही मागणी पूर्ण न झाल्यास जनतेचा असंतोष लक्षात घेता, काँग्रेस पक्षाच्या व नागरिकांच्या वतीने BSNL कार्यालय, MSEB कार्यालय व ग्रामीण रुग्णालयाला ताला ठोकण्यात येईल अशी ईशारा देण्यात आला.
सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353c अतिशय खराब अवस्थेत आहे.रस्ते खड्डेमय असल्यामुळे ST महामंडळ च्या बसेस पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे दररोज शालेय विद्यार्थी, रुग्ण, सामान्य नागरिक यांना खासगी वाहनांद्वारे जिवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे.अपघातांची शक्यता कायम आहे.शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
आरोग्य सुविधांचा अभाव हा आणखी एक गंभीर विषय आहे.सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात मागील ४ ते ५ महिन्यांपासून कोणताही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही.या कारणामुळे प्राथमिक उपचारांपासून ते शवविच्छेदनपर्यंत सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत.नुकत्याच एका घटनेत शवविच्छेदनासाठी डॉक्टरांना चक्क चंद्रपूरहून बोलावण्यात आले.हीबाब अत्यंत लाजिरवाणी असून यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.आपत्कालीन परिस्तितीत गर्भावती महिला,स्नेक बाईट रुग्ण, बाल रुग्ण,ऍक्सिडेंट रुग्णांना डॉ.नसल्यामुळे उपचारा अभावी तेलंगणा रेफर केले जाते.त्यामुळे अनेक लोकांनी रस्तेवर जीव गमाविले.
दुसरीकडे,BSNL नेटवर्कची स्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे. बँक व्यवहार, सरकारी ऑनलाईन सेवा, ई-गव्हर्नन्सचे उपक्रम, आरोग्य सेवा, शैक्षणिक उपक्रम – या सर्व गोष्टी पूर्णपणे ठप्प होतात कारण नेटवर्क उपलब्धच नसते.नागरिकांना यासाठी तालुक्याबाहेर जावे लागते, ज्यामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास वाढला आहे.शेतकऱ्यांनाही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. महाडीबीटी पोर्टलवरील अडचणी, माहितीचा अभाव व कार्यालयीन गलथान कारभार यामुळे शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहत आहेत.कृषी विभागाचा गतीशीलपणा शून्य असून,समाधानकारक माहिती व सेवा दिल्या जात नाहीत.
महावितरण विभागाकडून नियमितपणे होणारी वीज खंडितता ही सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त करणारी बाब ठरली आहे.तालुक्यातील सुमारे ७०% गावांमध्ये दररोज वीज पुरवठा खंडित राहतो. त्यामुळे शैक्षणिक,आरोग्य, शेती आणि पाणीपुरवठा यावर मोठा परिणाम होत आहे.महावितरण कार्यालयातील कर्मचारी जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात,असे जनतेचे म्हणणे आहे.वरील सर्व समस्यांमुळे सामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण झाली असून,प्रशासनावरचा विश्वास डळमळीत झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, या सर्व समस्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी पुढील 10 दिवसांच्या आत एक उच्चस्तरीय समिती गठित करण्यात यावी.या समितीद्वारे सर्व संबंधित विभागांचे कार्यस्थळी निरीक्षण करून उपाययोजना ठरवण्यात याव्यात व त्याची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत करण्यात यावी.अन्यथा, जनतेचा असंतोष लक्षात घेता, काँग्रेस पक्षाच्या व नागरिकांच्या वतीने BSNL कार्यालय,MSEB कार्यालय व ग्रामीण रुग्णालयाला ताला ठोकण्यात येईल,यासंदर्भात पुढील पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील.
हा निर्णय समाजहित व जनतेच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी घेतलेला आहे.प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय घेतल्यास व तातडीने कृती आरंभ केल्यास आंदोलनाची गरज भासणार नाही.तरी आपणास विनंती की,वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केले. त्यावेळी माजी नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, कांग्रेस शहर अध्यक्ष अब्दुल सलाम, तालुका उपाध्यक्ष शंकर मंचरला,मोइनुद्दीन शेख,वेंकटस्वामी येमुला आदी उपस्थित होते.