Home सिरोंचा सिरोंचा शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा रस्त्यावर उतरून अंदोलन करू : राष्ट्रवादी...

सिरोंचा शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा रस्त्यावर उतरून अंदोलन करू : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला

54
0

सिरोंचा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फारेस्ट गार्डन पर्यंत रस्त्याची गेल्या काही महिन्यांपूर्वी पासून रस्त्यावरील खड्डे पडून येण्या – जाणाऱ्याना प्राणाला घातक ठरत आहे.त्या खड्ड्यामुळे कोणाची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सिरोंचा तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील असलेल्या हा रस्ता आरडा पेंटीपाका,अंकीसा, आसरअल्ली,पातागुडेम, गावात जाणारी मुख्य मार्गावर रुग्णालय आणि शाळे असल्याने शालेय विद्यार्थी आणि गर्भवती महिला या रस्त्याचा वापर करत असल्यामुळे त्यांचे जीव धोक्यात असते.त्याकरिता रस्त्यावरील समस्येवर लक्ष्य देवून खड्डे बुजविण्यात यावी, अन्यथा येत्या 10 दिवसात रस्त्यावर उतरून खड्ड्यात झाडे लावून शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशारा देखील सिरोंचा तालुका (शरद पवार यांचे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि वाहन चालकांकडून तहसीलदार सिकतोडे यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आले आहे.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस-चोक्कामावर,पदाधिकारी व कार्यकर्ते,वाहन चालकांसह बाधित ग्रामस्थांची उपस्थिती होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here