भामरागड : आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल भामरागड तालुक्यातील दौऱ्यावर होता.अजयभाऊ कंकडावार यांनी दौरा आटोपून परत अहेरी येथील निवास्थानी येत असतांना तालवाडा जंगल परिसरात तरुण हा दुचाकीने अपघात होऊन रोडच्या मेरेला पडून दिसला.नागार्जुन कोरेत ( 25 ) असे जखमी युवकांचा नाव आहे.
सदर काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार हे आपले वाहन थांबवून जखमी युवकाला बघायला गेलं तो युवक अत्यंत गंभीर परिस्तिथीत जखमी पडलेला होता.त्या वेळेस अजय कांकडालवार यांनी क्षणाचाही विलंबन ना करता आपल्या स्वतःचा वाहनात टाकून त्या गंभीर जखमी युवकास अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी त्या युवकांच्या परिवाराला घटनेची संपूर्ण माहिती दिली.जखमी युकांना औषध उपचारकरिता आर्थिक मदत केली.त्यावेळी अजयभाऊंनी त्या नातेवाईकांना सांगितले की”युवकांना औषध उपचारासाठी अडचण भासला तर मला काळवा असा धीर त्यांनी त्या कुटुंबातील नातेवाईकांना दिले.त्यावेळी भाऊंची कोरेत परिवारातील समस्त नातेवाईकांनी आभार मानले.
यावेळी आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह कोरेत परिवारातील नातेवाईक तसेच आविसं काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या तालवाडा जंगल परिसरातील अपघातग्रस्ताला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला मदतीचा हात