Home मुख्य बातम्या सिरोंचा येथील श्री.गोदादेवी व रंगनाथस्वामी कल्याण महोत्सवाला – अजयभाऊ कंकडालवार दाम्पत्याकडून एकेवीस...

सिरोंचा येथील श्री.गोदादेवी व रंगनाथस्वामी कल्याण महोत्सवाला – अजयभाऊ कंकडालवार दाम्पत्याकडून एकेवीस हजार रु.ची.आर्थिक देणगी

53
0

सिरोंचा : येथील अतिप्राचीन व प्रख्यात बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दक्षिणात्य परंपरेनुसार हजारो वऱ्हाडांच्या (भक्तांच्या) साक्षीने तेलंगणातल्या वेद पंडितांच्या मंत्रोपचाराने,वाजयंत्रीच्या गजराने श्रीमाता गोदादेवी व परमेश्वर रंगनाथस्वामींच्या कल्याण महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला.

सिरोंचा येथील बालाजी मंदिरात दरवर्षी श्रीमाता गोदादेवी व रंगनाथस्वामी कल्याण महोस्तव मोठ्या दिमाखात पार पडतात.या कल्याण महोत्सवाला सिरोंचा शहरासह तालुक्यातील तसेच तेलंगणतील बालाजी भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भगवान बालाजीसह माता गोदादेवी व रंगनाथस्वामीचे दर्शन घेत असतात.

सिरोंचा येथे आज मोठ्या उत्साहात पार पडलेल्या श्री.गोदादेवी व रंगनाथस्वामी कल्याण महोत्सवाला जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार दाम्पत्याकडून एकेवीस हजार रुपयांची आर्थिक देणगी पाठविले.सदर देणगी अजयभाऊचें कार्यकर्त्यांनी कल्याण महोत्सव कार्यक्रमस्थळी जाऊन बालाजी मंदिराचे अर्चक सत्यनारायण दाशरथी यांना सुपूर्द केले.अहेरी निवासी कंकडालवार दाम्पत्याकडून प्राप्त या आर्थिक देणगीबद्दल मंदिराचे अर्चकांनी अजयभाऊ कंकडालवार दाम्पत्याचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here