राजाराम : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत आज प्राथमिक आरोग्य पथक राजाराम व अंगणवाडी केंद्र राजाराम येथे ग्रामपंचायत चे सरपंच मंगला आत्राम व उपसरपंच रोशन कंबगौनिवार यांचे हस्ते 3 मार्च 2024 रोजी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापुर/राजाराम चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश मानकर साहेब, श्री.कुंभारे सर MPW, वाडघुरे सर HA,निता रामटेक ANM, घरत प्रेमिला आत्राम PTA, अंगणवाडी सेविका पुष्पा गोंगले,अंगणवाडी सेविका तृप्ती सिडाम, अंगणवाडी सेविका लक्ष्मी सिडाम,अंगणवाडी मदतनिस विजया कुमरे, राहुल कंबगौनिवार, संतोष करमे मेजर,उपस्थित होते
प्राथमिक आरोग्य पथक राजाराम अंतर्गत एकूण 11 बूथ मधून 380 बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. शून्य ते पाच वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरण मोहिमेपासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या बाळाला नजीकच्या सरकारी दवाखाना, अंगणवाडी केंद्र, या ठिकाणी नेऊन बाळाला पोलिओ डोस पाजून घ्यावे व बाळाला पोलिओ मुक्त करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर साहेब यांनी केले आहे..