सिरोंचा : गडचिरोल्ली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर बसलेला सिरोंचा तालुका हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर बसलेला अतिसंवेदनशील तालुका आहे.या तालुक्या अंतर्गत अनेक मोठं मोठी गावे येतात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानी सुद्धा अविकसित मानलं जातं
सिरोंचा तालुक्यात असलेला शासकीय रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात परंतु संबंधित विभागाच्या वरिष्ठांना वेदना कळेना कधी कर्मचाऱ्यांची समस्या कधी विजेची समस्या अशातच रुग्णांचे बहाल झाले आहे.या सर्व बाबींचा कंटाळून सिरोंचा येथील नागरिकांनी आविसं काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडाळवार यांना आज दूरध्वनीद्वारे माहिती दिली’की.
रुग्णालयात रुग्णांना पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही रुग्णांच्या जीवाशी खेड होतो रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही तालुका मुख्यालयी शासकीय रुग्णालय असल्यामुळे व जास्तीत जास्त खेड्यापाड्यातील लोकसंख्या असल्यामुळे आम्हाला उपचारासाठी नाईलाजाने तालुका मुख्यलयाच्या रुग्णालयात यावे लागते परंतु आमच्या जीवाशी खेड होत असेल तर आम्ही जायचे कुठे असे सांगितल्यावर विलंब न करता.
काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडाळवार यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले.या वेळी त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की तात्काळ रुग्णांना पाण्याची सुविधा व वेळेवर उपचार उपलब्ध करून घ्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
Home मुख्य बातम्या सिरोंचा रुग्णालयाला सोइ सुविधा पुरवा अन्यथा आंदोलन करू : माजी जि.प.अध्यक्ष ककंडालवार