अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे व कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला नेत्यांनी तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पाक्ष प्रवेश केली.
त्यावेळी पक्षाप्रवेश ग्रामपंचायत सदस्य सौ.माया प्रकाश कोरेत,सौं.शाहीजीदार रुस्तमाखाॅ पठाण,किशोर सडमेक,प्रकाश कोरेत,सतीश कोरेत,संजू आत्राम,जागपती सडमेक,साईनाथ उरेते,तिरुपती सडमेक,पत्रू पोच्या आत्राम,सुरेश आलम,दिलीप आत्राम,दौलत उरेते,अमोल आत्राम,मनोज सडमेक,प्रभाकर आत्राम,बबूराव मडावीसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करीत.
महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान साहेबांचा नेतृत्वावर – काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले.सदर पक्षाप्रवेश कार्यक्रम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील निवास्थानी घेण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षात पक्षाप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची ना.विजयभाऊ वडेट्टीवार,खासदार डॉ.नामदेव किरसान साहेब,काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार,जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते शाल व पक्षाचे दुप्पटा टाकून पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील समस्त काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.