अहेरी : तालुक्यातील नंदिगाव येथील रवींद्र बापू आलाम यांना काही वर्षा पासून किडनीचा आजार असल्याने औषधी चालू होते.परंतु काही महिन्या पासून प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी वर्धा येथील सेवाग्राम दवाखान्यात भर्ती होऊन उपचार घेत होते.आलाम यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना दवाखान्यात औषध व उपचार घेउनही तब्बेतीत काही फरक पडत नव्हता तसेच आर्थिक अडचण सुद्धा भासत होते.म्हणून एक दहा दिवसा अगोदर नंदिगाव येथे स्वगृही परत आले होते.
काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच काँग्रेसनेते व देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे कडून माहिती मिळताच त्यांनी आलाम कुटुंबाचे नातेवाईकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली.
आज त्याची पत्नी व नातेवाईकांनी अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येते अजयभाऊंची भेट घेऊन पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात न्यायचे आहे.परंतु आलाम कुटबाची आर्थिक परिस्थिती सांगितल्यानंतर माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आलाम परिवाराला नागपूर येथे औषध उपचाराकरीता आर्थिक मदत केली.
यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून आलाम कुटुंबियांना मोठा धीर दिला.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,हरीश गावडे ग्रामपंचायत उपसरपंच देवलमारी,संदीप दुर्गे,दिलीप मडावी,रुपेश कंनाके,सुधाकर आलाम,करन आलामसह आदी उपस्थित होते.