Home अहेरी सुर्यापल्ली येथे काँग्रेस नेते कंकडालवार दाम्पत्यांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

सुर्यापल्ली येथे काँग्रेस नेते कंकडालवार दाम्पत्यांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

5
0

अहेरी : तालुक्यातील राजाराम जवळील सूर्यापल्ली तेथे पुरातन शिव मंदिर होता,मात्र या मंदिराची जीर्ण अवस्था झाल्याने येथील गावकऱ्यांनी व शिवभक्तांनी नव्याने मंदिर बांधकाम व शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा स्व:खर्चाने करून देण्याची विनंती काँग्रेसचे युवा नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे केले होते. अजयभाऊ कांकडालवार यांनी या धार्मिक कार्यासाठी पुढाकार घेत येथील गावकऱ्यांची व शिवभक्तांची विनंतीला मान देऊन सुर्यापल्ली येथे  नव्याने शिव मंदिराची पूर्ण बांधकाम करून देत त्यांच्याच दाम्पत्यांच्या हस्ते नुकताच या मंदिरात शिवलिंगाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा शेकडो नागरिक व असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत  भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटात पार पडला.

सुर्यापल्ली येथे अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकाराने नव्याने बांधण्यात आलेल्या शिवमंदिरात सर्वांचे आराध्य दैवत शिवजीचे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता.सदर प्राणप्रतिष्ठा सोहळा हे काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार व त्यांची धर्मपत्नी सोनालीताई कंकडालवार या दाम्पत्यांच्या शुभहस्ते वेदपंडितांच्या मंत्रोपचाराने विधिवत पूजा अर्चना करून शेकडो शिवभक्तांच्या भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्य महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.या महाप्रसादाचे मान्यवर मंडळींसह गावकरी व शिवभक्तानी आस्वाद घेतले.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला  काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार,माजी पंचायत समिती उपसभापती सोनालीताई कंकडालवार,मंदाताई कंकडालवारसह सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखाआलाम,माजी उपसरपंच संजय पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य सुखदेव आलाम ऍड.एच के आकदर,तंटामुक्ती अध्यक्ष मुत्ताजी पोरतेट,माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण कंबागोनिवार,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,नामदेव पेंदाम,भगवान तलांडे,पुरुषोत्तम अर्गेला,नारायण चालूरकर,तुळशीराम पोरतेट,सूर्यकांत आलाम,दिवाकर आलाम,महेंद्र कुसराम,जयराम आत्राम,दिपक आलाम,ज्योती आलाम,सावित्री चिप्पावार,वंदुताई पोरतेट,प्रमोद गोडशेलवार,सचिन पंचर्यासह गावकरी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here