Home सिरोंचा सिरोंचात महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळी फीत लावून निषेध

सिरोंचात महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळी फीत लावून निषेध

16
0

सिरोंचा : ठाणे जिल्ह्यातील बदलापुर शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर शाळेतील नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संताप घटना घडली.तसेच आरमोरी येथील एका मुलीवर सुद्धा काही इसमांनी अमानवी कृत्य केले होते.अशा अमानवीय घटना दिवसेंदिवस वाढत असतांना शासन सदर प्रकार थांबविण्यात अयशस्वी ठरले आहे.त्यामुळे  अशा असंवेदनशील कृत्याचा निषेध करीत महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी शनिवारी, (दि.24) सिरोंचा बसस्थानकासमोर तोंडाला काळ्या फित लावून शासनाचा निषेध केला.बदलापूर येथील संतापजनक घटनेचे राज्यभरात पडसात उमटले आहेत.

सातत्याने महिलांवरील अत्याचारात वाढ होत असतांना शासनाद्वारे सदर प्रकार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.बदलापूरच्या घटनेला घेऊन महाविकास आघाडीने आज, शनिवारी बंदची हाक दिली होती.मात्र मुंबई न्यायालयाने आंदोलनास प्रतिबंध घातल्याने महाविकास आघाडीतील पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी स्थानिक सिरोंचा बसस्थानकासमोर एकत्र येत तोंडाला फित बांधून मुक निदर्शने करीत राज्य शासनाचा निषेध नोंदविला.

यावेळी आंदोलनस्थळी आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही.पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे.आता संतापचा कडेलोट होत आहे.अशा शब्दांत माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांनी आपली भूमिका मांडित शासनाच्या तीव्र निषेध केला. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here