अहेरी : तालुक्यातील बोरी येथील रहिवासी भयाजि चंद्र सिडाम हे काही कामनिमित्य काल दिनांक २७/९/२०२४ रोजी दुचाकीने तेलंगणा जात होते तेलंगणा जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.त्या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय फॅक्टर झाले.ही बाब अपघातग्रस्तांचा पत्नीने काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सांगितली.
व या गंभीर बाबीला समजून काँग्रेस नेते कंकडालवार यांनी त्यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली व पुन्हा मदतीची किव्हा कोणताही मदतीची गरज भासल्यास निसंकोच माझ्याशी संपर्क साधा मी तुमच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करिन अशे आश्वासन दिले या वेळी अपघातग्रस्त भयाजि चंद्र सिडाम यांच्या पत्नीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे आभार मानले.
यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,विनोद रामटेके,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.