Home अहेरी वाल्मिकी जयंती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांची उपस्थित

वाल्मिकी जयंती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांची उपस्थित

2
0

अहेरी : दरवर्षी शारदा व दुर्गा नवरात्री पौर्णिमेला महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी केली जाते.यंदाही गुरूवारी 17 ऑक्टोबरला रामायणाचे रचेते,महर्षी वाल्मिकी जयंती असल्याने अहेरी शहरात विविध ठिकाणी जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालं.

यंदा थोर महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त तालुक्यातील वेलगूर आणि अहेरी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 17 गडअहेरी येथील जयंती कार्यक्रम आयोजित केले आहे.आयोजित जयंती कार्यक्रमला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी उपस्थित राहून महर्षी वाल्मिकी यांचा प्रतिमेला पुष्पअर्पणा करून अभिवादन करत उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी अजय कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीता चालूरकर,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,ताशू शेख,सलाम शेखसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here