Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेची उदघाटन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेची उदघाटन

19
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत मेडपल्ली अंतर्गत येणाऱ्या कोरेली ( खु )येथील नवयुवक क्रीडा मंडळ कोरेली खुर्द द्वारा भव्य खुले कब्बडी सामन्यांचे आयोजन केले.या कब्बडी सामन्यांचे आविस काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्करभाऊ तलांडे,पेरमिलीचे सरपंच सौ. किरणंताई कोरेत,उपसरपंच सुनिल सोयाम,व्ही.सी.कोंडागुर्ले,सुरेश दुर्गे,आसिफ पठाण(पत्रकार) सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र गर्गम,सामाजिक कार्यकर्ता स्वप्निल मडावी, दिवाकर तलांडे, लक्ष्मण तलांडे,सुरज तलांडे,सुरज आत्राम,रमेश मडकाम,सुरेखाताई, पुंगाटी ताई,बुर्सी आत्राम, कविता तलांडे,सुनीता मडकाम,मानू पुंगाटी, महारू तलांडेसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here