अहेरी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचे महत्व अनन्य आहेत. सामाजिक माध्यमाना विशेष स्थान आहे.भारतीय राजकारणातही सोशल मीडियाला खूप महत्व असल्याचे जाणवत आहे.एखाद्या राजकारणी व्यक्तींनी केलेली सामाजिक कार्याची माहिती प्रसारित किव्हा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाची आवश्यकता असते म्हणून राजकीय नेते आपल्या दैनंदिन जीवनातील कार्याना योग्य प्रचार व प्रसिद्धी मिळावे म्हणून सोशल मीडियाचा वापर केला जात असतात.
यात अजय कंकडालवार सुद्धा मागे नाहीत. आजच्या घडीला त्यांच्या सोशल मीडियातला प्रचार व प्रसिद्धीला तोड नाही.हाती सत्त्ता असो किंवा नसो त्यांच्या नेहमी सामाजिक माध्यमांवर दैनंदिन कार्य इतर राजकीय नेत्यांपेक्षा जास्त दिसून येतात.
कंकडालवार यांची सोशल मीडियाचे काम सिरोंचा येथून सुरु असून अजय कंकडालवार यांचे कट्टर समर्थक आणि पत्रकारिता क्षेत्रात दांडगा अनुभव असलेले रवी सल्लम अन संपत गोगुला हे दोघे पद्धतशीर पणे सांबळत असतात.अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रत्येक कार्याला हे दोघेही सामाजिक माध्यमांमध्ये योग्य स्थान मिळवून देण्याचं आटोकाट प्रयत्न करीत असतात.