अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील 7स्टार क्लब इंदाराम यांच्या वतीने भव्य खुले 60 किलो वजन गटाचे कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते .या कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झालं .
कब्बड्डी स्पर्धेसाठी इंदारामसह परिसरातील अनेक संघ दाखल झाले होते .विशेष म्हणजे आज पासून सुरु झालेल्या कब्बड्डी स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या कडून पहिला पारितोषिक ठेवण्यात आले आहे.तसेच दुसरा पारितोषिक माजी जि.प.सदस्य अजय नैताम,सुनीता कूसनाके,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम,भास्कर तलांडे कडून तर तिसरा पारितोषिक इंदाराम ग्रामपंचायतचे सरपंच वर्षा पेंदाम,उपसरपंच वैभव कंकडालवार,ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम कडून देण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.सर्व प्रथम कंकडालवारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,माता सरस्वती,वीर बाबुराव शेडमाके यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमला सुरुवात केले.त्यावेळी मंडळकडून तसेच गावातील ग्रामस्थान कडून अजय कंकडालवार यांचे ढोल तशाने स्वागत केले.
यावेळी मंचावर सदाशिव दुर्गे पोलीस पाटील इंदाराम,पुल्लुरवार सर देवलमरी केंद्र प्रमुख,पत्तीवर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदाराम,प्रकाश पेंदाम शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष इंदाराम,दादाराम नैताम प्रतिष्ठित नागरिक इंदाराम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदाराम ग्रामपंचायतचे सरपंच वर्षा पेंदाम,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवारंवार,नामदेव तलांडी,शेरखां पठाण,महेश आत्राम, संतोष सिडाम,कालिदास आत्राम,संदीप कोरेत,प्रविण कोरेत,लालू आलाम,राकेश सडमेक, नरेश गर्गम,लक्ष्मण आत्रामसह आदी उपस्थित होते.