मुलचेरा : तालुक्यातील देवदा येथील जय हेडोन पेन युवा क्रीडा मंडळ देवदा यांच्या सौजन्याने ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल सामन्याचे उदघाटन सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित होते.
व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी पाहिलं पारितोषिक ग्रामसभा देवदा कडून दुसरा पारितोषिक जय हेडाने पेन युवा क्रीडा मंडळ देवदाकडून तसेच तिसरा पारितोषिक राष्ट्रीय महिला बचत गट कडून देण्यात येत आहे.त्यावेळी मंडळकडून अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांच्या स्वागत,सत्कार करण्यात आली आहे.यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य रवींद्र शहा,काँग्रेस नेते – आविसं अध्यक्ष एटापल्ली,देवदा ग्रामपंचायतचे सरपंच केसरी पाटील तेलामीसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेतन पाटील साहेब तहसीलदार मुलचेरा,केशरी पाटील तेलामी सरपंच ग्रामपंचायत देवदा,मेश्राम तलाठी मुलचेरा,मनोहर उसेंडी भूमिया देवदा,रामदास उसेंडी गाव भूमीया,नरेश कांदो उपसरपंच वेंगनुर, कार्तिक तोगम माजी उपसरपंच,कवडुजी चलावार काका,टिंगुसले साहेब सचिव,सुमित्रा हिचामी,वनिता ताई तीम्मा ग्रामपंचायत सदस्य,ज्योती मट्टामी,वनिता हलामि,कोपा उसेंडी, बाबूराव कांधो,सुधाकर कुड्येटी,शामराव नरोटे,साधू कोलामी,शामराव कुडयेटी,भिवाजी पोटावी,साधू कुडयामी,भिक्काजी परसा,गिरिधर उसेंडी,मनोहर तुमरेती,जयराम कोलामि,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.