एटापल्ली : तालुक्यातील चंदनवाली येथील शिव शंकर नाट्य कला मित्रमंडळाकडून आयोजित ‘मी शुक्राची चंदणी’नावाचं नाट्यप्रयोगाचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.
उदघाटनीय मार्गदर्शन करतांना कंकडालवार यांनी म्हणाले कि,आजच्या या डिजिटल काळात सुद्धा ग्रामीण भागात नाटकांचे महत्व अबाधित असून नाट्यप्रयोगाचे सादरीकरणातून समाजात जनजागृतीचे कार्य होत असतात.आणि यातून समाजाचे परिवर्तन ही होत असतात.
या कार्यक्रमाचेसह उदघाटक म्हणून माजी जि.प.सदस्य करुजी रापंजी होते.अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.सहअध्यक्ष म्हणून नंदूभाऊ मट्टमी हे होते.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष तोडसाम,तशुभैय्या शेख,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील व स्थानिक नागरिक तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी चंदनवेली येथील ‘मी शुक्राची चंदणी’नाट्यप्रयोगाचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन