Home सिरोंचा सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटी नगरपंचायतवार धडक

सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटी नगरपंचायतवार धडक

32
0

सिरोंचा : शहरात किंवा तालुक्यात अनेक वर्षांपासून  वातानुकूल शवगार फ्रिज ( एसी शवपेटी ) उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन होत आहे.सिरोंचा हे तालुका ठिकाण असुन शहरात Ac शवपेटी उपलब्ध नाही.ही गंबीर बाब आहे.रात्री अपरात्री सर्वदूर फिरूनही शेवपेटी मिळत नाही. त्यामुळे अंत्यविधी सुद्धा लवकर करावे लागत असल्याने जवळचे नातेवाईकांना शेवटचे अंत्यदर्शन साठी मुकावे लागत आहे.

त्या करीता नगरपंचायत तर्फे शवपेटी उपलब्ध करावी.तसेच सिरोंचा नगरपंचायत हद्दीअंतर्गत येत असलेल्या शहरातील विविध वॉर्डात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत.या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या मागणीला घेऊन सिरोंचा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालय येते मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष यांना सादर करण्यात आले.

शहरातील बंद असलेले वॉटर,एटीएम,दुरुस्त करण्यात यावे,हायमॉस्ट पथदिवे तत्काळ दुरुस्ती करावे.शहरातील विविध वार्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तत्काळ प्रतिबंधात्मक फवारणी करावी.शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी आदी मागण्यांचे निवेदन नगराध्यक्षा यांना सादर करण्यात आले.

यावेळी नगरपंचायत उपाध्यक्ष श्री.बबलुभाऊ पाशा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिष्टमंडळाशी चर्चा करुन लवकर समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.तसेच वातानुकुल शवगार फ्रिज( Ac शवपेटी) नागरिकांच्या सेवा साठी लवकरच उपलब्ध करण्याची गाव्ही देण्यात आले.

त्यावेळी सिरोंचा कांग्रेस तालुकाध्यक्ष सतीशभाऊ जवाजी,जेष्ठ कांग्रेस नेते श्री.ब्रह्मनंदजी कोत्तागट्टू, शंकर मंचार्ला,मारुती गणपूरपूवार,अडपा मल्लया,समय्या चिलमूला,आनंद आशा,शहर अध्यक्ष अब्दुल सलाम,शहर उपाध्यक्ष प्रवीण नामानी,युवा कांग्रेस चे माजिद अलीसह आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here