अहेरी : राजकारण,समाजकारण करीत असतांना सामान्यांप्रती कणव असावी लागते.लोकांच्या सुख दुःखात धावून जाणारा, त्यांच्या वेदनेची जाणीव ठेवून त्यांच्या अडी अडचणी सोडविणारा खऱ्या अर्थाने नेहमी लोकांच्या मनात घर करून जातो.पण आजच्या काळात हल्ली असे नेते फार दुर्मिळ झालेत.
काल रात्री ठीक 7 वाजता अहेरी वरून गावाकडे येत असतांना व्येंकठरावपेठा गावाजवळ कापूस भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने इंदाराम येथील युवक किशोर तलांडे यांचे जागीच निधन झाले.या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला नेत्या भाग्यश्री आत्राम दौऱ्यावर होत्या.मात्र अपघातस्थळावरून जात असतांना त्यांनी घटनेची साधा विचारपूस सुद्धा केली नसल्याची माहिती घटना स्थळावरील प्रत्यक्ष उपस्थित सूत्रांकडून मिळाली असून या उपरही या महिला नेत्याने घटनास्थळी आपलं वाहन थांबविण्याचे साधे सौजन्य सुद्धा दाखविले नसल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र दुसरीकडे आविसं,काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना दुःखद घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनेची सविस्तर माहिती घेऊन त्या मृतक कुटुंबाला मदतीचा हात देत त्यांचे आपुलकीने सांत्वन केल्याची माहिती मिळाली आहे.
एकंदरीत वरील घटनेच्या निमित्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या भाऊ अन ताईं या दोघांमधील सामाजिक कार्यातल्या अंतर जर कोणालाही जाणवल्यास यात नवल वाटू नये.