Home सामाजिक सुरजागड येते ओअदलपेन ठाकूरदेव  दर्शन पारंपरिक इलाका ग्रामसभा कडून जत्राचे आयोजन

सुरजागड येते ओअदलपेन ठाकूरदेव  दर्शन पारंपरिक इलाका ग्रामसभा कडून जत्राचे आयोजन

22
0

एट्टापली : तालुक्यातील पुरसागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत सूरजागड पहाडीवार ओअदलपेन ठाकूरदेव मंदिर आहे.येथे दर वर्षी आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने जत्राचे आयोजन करत असतात.जल जंगल जमीन व ग्रामसभा बाबतीत विचारमंथन करण्यात येतो.

           ५ जानेवारी ते ७ जानेवारी पर्यंत ठाकूरदेव जत्रा महोत्सव,पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन एट्टापट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.ठाकूरदेव  आदिवासी बांधव प्रमुख दैवत मानत असता शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्र येवुन विविध विषयावर चर्चा करत असतात.

            या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव एकत्र येतात व जत्रा आयोजन करतात.आज आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थित दर्शवून ठाकूरदेवची विविध पूजा करून दर्शन घेतले.

     यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,प्रशांतभाऊ,ताशू शेख,दिनेशभाऊसह इलाका पट्टीचे सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here