अहेरी : तालुक्यातील देवलमारी येथील न्यू स्टार व्हॅलीबॉल मंडळ द्वारा भव्य खुले व ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे.द्वितीय पारितोषिक समस्त गानली समाज कडून आणि तृतीय पारितोषिक मा.श्री.लाडे साहेब सचिव तथा लक्ष्मण कन्नाके सरपंच यांचे कडून असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली.
सदर स्पर्धेत परिसरातील तसेच इतर तालुक्यातील अनेक संघ भाग घेतले होते.आज शेवटचा दिवस अंतिम सामना तेलंगणातील येसानवाई विरुद्ध देवलमरी यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक येसानवाई संघाला तर दूसरा पारितोषिक देवलमरी संघाला तिसरा पारितोषिक सिरोंचा तालुक्यातील मुक्कीडगुठा संघाला मिळाले असून देवलमरी येथील काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमला देवलमरी ग्रामपंचायतचे सदस्य महेश लेकूर,माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गोंडे,पेसा अध्यक्ष शंकर आत्राम,सुधीर बामणकर,नागेश राऊत सदाशिव भामणकर,अक्षय अल्लेवार,अक्षय गुंडावार,कमलाकर गद्देपाकवार,सूरज काटेल,रवी मडावी,रवी पानेम,रमेश तोकला,नंदू तोकला,सुधाकर लेकूर,येलय्या तोकलासह आदी उपस्थित होते.