मुलचेरा : तालुक्यातील सुंदरनगर येथील अजय कंकडालवार यांचे खंदे समर्थक व काँग्रेसचे पदाधिकारी कमलेशभाऊ सरकार यांच्या नातीन कु.चाहवी हलदर हिच्या अन्नप्रसन्न कार्यक्रम सुंदरनगर येथील त्यांचे निवास्थानी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार व त्यांचे अर्धांगिनी तथा काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून शुभाशीर्वाद देऊन भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी,रवि शहा माजी जि.प.सदस्य,सुकुमार दास,अनंत बैरागी,रणजित सुपद, स्वर्णकार ग्रामपंचायत सदस्य,मनोज बैरागी मुख्य व्यवस्थापक प्रगती बँक,पि बी मंडल मुख्याध्यापक, डॉ. रणजित मंडल,प्राचार्य सिनियार सायन्स कॉलेज मुलचेरा,विपुल निरांजन पाल,कुणाल सरकार,गौरिश मजुमदार,सत्यजित शिलदार,उत्तम हलदार,शैरभ सिलदार,अयांश अभिजीत रॉयसह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.