भामरागड : व्हाॅलीबाॅल हा खेळ या परिसरातील अतिशय आवडता खेळ आहे.तसेच हा खेळ अतिशय रोमांचक आणि प्रसिद्ध खेळ आहे.आज या खेळाला राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्य महत्व आहे.अहेरी शहरातही पूर्वीपासून क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून हाँकी,फुटबॉल,व्हॉलीबॉल व क्रिकेट असे अनेक खेळांचे आयोजन होत असे.यापूर्वी या शहरातील मैदानावर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडूंनी मैदान मारल्याचे अनेक उदाहरणे आहेत.अख्या गडचिरोली जिल्ह्यातच आजही भामरागड शहर हे क्रिडा क्षेत्रासाठी अत्यंत प्रसिद्ध शहर असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.ते भामरागड तालुक्यातील बांडेनगर येथे आयोजित व्हाॅलीबाॅल सामन्याचे उदघाटन प्रसंगी केले.
त्यावेळी उदघाटन प्रसंगी पुढे भाषणातून बोलतांना अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक व युवतींच्या अंगी असलेल्या कला गुणांना वावं मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात काँग्रेस व आविसं,अजयभाऊ मित्र परिवारकडून विविध खेळांचे आयोजन केले जात अनेक सामन्यांना पुरस्कारही दिले जात असून यापुढे सुद्धा क्रिडा स्पर्धांच्या आयोजनासाठी माझ्या कडून व मडावी साहेब कडून खेळाडूंना सर्वतोपरी मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भामरागड तालुक्यातील बांडेनगर येथील गोंडवाना सुपर किंग्स क्रीडा मंडळ मोकेला -बांडेनगर यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या स्पर्धेची उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी काँग्रेसनेते अजय कंकडालवार कडून प्रथम,द्वितीय आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून पारितोषिक देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत इरकुड्डूमे सचिव,ग्रामपंचायत माडवेली सचिव तसेच सर्व कर्मचारी व पदाधिकारी कडून देण्यात येत आहे.दरम्यान अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी गावातील आगमन होतच ढोल तशाने जंगी स्वागत केली.तसेच मंडळ व गावकरी कडून सत्कार व स्वागत करण्यात आली.
यावेळी लक्ष्मीकांत बोगामी काँग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड,विष्णू मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,मल्लेश तलांडी सरपंच ग्रामपंचायत मडवेल्ली,परमेश तलांडी उपसरपंच ग्रामपंचायत मडवेल्ली,प्रभाकर मडावी मनेराजाराम,चल्लावार काका,शामराव सडमेक,देवाजी वेलादी,रावजी येरमा,साईनाथ सडमेक,वेलादी म्याडम सरपंच ग्रामपंचायत बेज्जूरपल्ली,रावजी येरमा गाव पाटील मोक्केला तसेच गावातील नागरीक खेळाळू व स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.