अहेरी : चीनवाट्रा ते ग्रामपंचायत अवलमरी दरम्यानच्या नदीवर केवळ एक लहानसा पूल असून,पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो.त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते.विशेषतः रुग्ण, महिला,विद्यार्थी आणि वृद्धांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ही समस्या दूर करण्यासाठी आदिवासी विध्यार्थी संघचे नेते,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक अजय कंकडालवार यांनी तहसीलदारांची भेट घेतली.त्यांनी प्रशासनाकडे संपूर्ण पावसाळ्यात नियमित आणि सुरक्षित बोटीची व्यवस्था करण्याची जोरदार मागणी केली.
दुर्गम भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.योग्य व्यवस्था केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि अपघातांची शक्यताही टळेल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच त्यावेळी कंकडालवारांनी पुरामुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांची पंचनामे करून लवकरात लवकर शासन कडून मदत मिळण्यात यावी म्हणून तहसीलदार साहेबांकडे मागणी केले आहे.
यावेळी चर्चा दरम्यान अजय कंकडालवार यांच्या सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या धोकादायक प्रवासाला आळा घाला : अजय कंकडालवार यांनी तहसीलदारांची भेट घेऊन बोटीच्या...