Home अहेरी भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील तरुण लालचंद कपिलसाही यांची पुराच्या नाल्यात पडून मूत्यू

भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील तरुण लालचंद कपिलसाही यांची पुराच्या नाल्यात पडून मूत्यू

24
0

अहेरी :भामरागड तालुक्यातील कोडपे या गावातील एका दुःखद घटनेप्रसंगी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः उपस्तित राहून वडिलधारी माणूस बनून त्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली आहे.भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील एक युवक खंडी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची बातमी समोर आली होती.

भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिलसाही लकडा (19 वर्षे) हा तरुण खंडी नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला.लालचंद हा सोमवारी आपल्या कामानिमित्त खंडी गावात गेला होता.काम आटोपून परत येत असताना खंडी नाल्याला पूर आला होता. पुराचा प्रवाह सुरु असतांना तो वाहता नाला पार करण्याचं प्रयत्न केला.मात्र दुर्दैवाने पाण्याच्या प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो नाल्यात वाहून गेला होता.

वाहून गेलेल्या लालचंद कपिलसाही लकडा त्यांची शोध मोहीम केल्यानंतर अखेर त्यांची मृतदेह बुधवारला  हाती लागला.नातेवाईकांनी मृतकाची शवविछचेदन करण्यासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय आणण्यात आले होते.

या दुःखद घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार कळताच त्यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन त्या लकडा कुटुंबाची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतले.

त्यावेळी अजय कंकडालवार यांनी स्वत उपस्थित राहून लागणारे संपूर्ण साहित्य खरेदी करून दिले,मृतक लकडा कुटुंब अंत्यत गरीब असून मृतकाचे मृतदेह स्वगावी नेण्यासाठी त्या परिवाराला खूपच आर्थिक अडचण भासत होती,ही माहिती सुद्धा कंकडालवारांचा कानात पडल्याने अजयभाऊंनी तात्काळ खाजगी चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले.

मृतक लकडा परिवाराच्या आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पुढील होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमालाही आर्थिक अडचण भासत असल्याचा विषय अजय कंकडालवार यांना सांगितले  असता त्यांनी मदतीचे एक हात पुढे करत अंत्यविधी कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी आपल्या परीने आर्थिक मदत केले.
   
एकंदरीत या दुःखद क्षणात काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार हे मृतक लकडा कुटुंबियांसाठी देवदूत ठरले आहे.यावेळी मृतकाचे कुटुंबियांनी दुःखद क्षणात वडिलधाऱ्या माणसासारखे खंभीरपणे राहिल्याबद्दल कंकडालवार यांचे मनस्वी आभार मानले.

नाल्यात पडून पुरात वाहून गेलेल्या मृतक लकडा परिवाराला कंकडालवार कडून सर्वतोपरी मदती दरम्यान मृतकाचे कुटुंबीय,नातेवाईक आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here