Home अहेरी काँग्रेसनेते कंकडालवार यांनी दर्शविली आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला जाहीर...

काँग्रेसनेते कंकडालवार यांनी दर्शविली आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला जाहीर पाठिंबा

8
0

अहेरी : सेवेत नियमित केलेल्या अध्यादेशाचे तात्काळ अंमलबजावणी सह विभिन्न मागण्यांना घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानात मागील अनेक वर्षांपासून  कंत्राटी रूपात सेवा देणारे  कंत्राटी अधिकारी व कर्मचारीवर्ग 19 ऑगस्ट पासून अख्य राज्यात तालूका स्तरावर बेमुदत आंदोलन करीत आहे.

अहेरी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंडपाला आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन त्यांचे मागण्या व समस्या जाणून घेतले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य शाखा अहेरीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळाने कंकडालवार यांना आंदोलन मंडपातच निवेदन देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे विनंती केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारत आंदोलनकर्त्यांचे मागण्या रास्त असून केंद्र व राज्यसरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढून आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे आवश्यक असल्याचे मत कंकडालवार यांनी व्यक्त केले.

काँग्रेस नेते कंकडालवार यांनी,आपल्या मागण्या रास्त असल्याने आपण जातीने यात लक्ष घालून सरकारकडे योग्य पाठपुरावा करणार असल्याचे आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले.

यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार यांचे समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम उपस्थित होते.अजय कंकडालवार यांच्या आंदोलन मंडपाला भेटीदरम्यान आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्तीत होते.

सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुळातच आरोग्य सेवा अस्थीपिंजर ठरत असलेल्या जिल्ह्यात या आंदोलनाची फटका बसणार असून त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here