Home मुख्य बातम्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात : एकाच दिवशी दोन घटना ” प्रवाश्यांमध्ये भीतीचे...

एसटी महामंडळाच्या बसला अपघात : एकाच दिवशी दोन घटना ” प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

95
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

आलापल्ली : प्रवासी घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाल्याच्या दोन घटना सोमवारी 19 जून रोजी सकाळच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या.यात अहेरी-मुलचेरा-गडचिरोली व हैदराबाद-चंद्रपूर-अहेरी बसचा समावेश आहे.एकाच दिवशी दोन घटना घडल्यामुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अहेरी आगारात चाललंय तरी काय ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.प्राप्त माहितीनुसार काल सकाळच्या सुमारास अहेरी आगारातील अहेरी-श्रीनगर-मुलचेरा-घोट मार्गे गडचिरोली कडे जाणारी (बस क्रमांक एम एच-06 एस-8841) अहेरी वरून प्रवासी घेऊन निघाली होती.वेलगुर-किष्टापूर आणि गोमनीच्या मध्ये समोरून येणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने बसचा समोरचा काही भाग चकनाचूर होऊन खाली पडला.सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी बसचा नुकसान झाला आहे.प्रवाशी मात्र,भयभीत झाले होते.तर दुसऱ्या घटनेत अहेरी आगाराची हैदराबाद वरून अहेरी कडे येणारी (बस क्रमांक एम एच-40 वाय-5510) ला चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी जवळ अपघात झाला असून बसचा समोरचा काच पूर्णपणे फुटला आहे.याही अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसलीतरी बसचा चांगलाच नुकसान झाला आहे.

“अपघातांची मालिका सुरूच”

आलापल्ली ते आष्टी रस्त्याची दुरवस्था झाल्याने मागील एक ते दीड वर्षांपासून आलापल्ली ते मुलचेरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली असून अरुंद रस्त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे.चंद्रपूर व गडचिरोली जाण्यासाठी खाजगी वाहनधारक याच रस्त्याचा अवलंब करीत आहेत.दररोज या रस्त्यावर अपघात होत असून प्रवाश्यांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे सदर रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी केली जात आहे.

“एसटी बसच्या फेऱ्या घटल्या, बिघाड वाढले?

भविष्यात येणाऱ्या नव्या गाड्यांची स्वप्न रंगवत असताना सर्वसामान्यांचा वर्तमानातील एसटी प्रवास अडचणीचा आणि त्रासदायक ठरत आहे. गेल्या 2 वर्षात एसटी सरासरी फेऱ्यांची संख्या घटली आहे.तर जुन्याच बस वापरात येत असल्याने व नवीन बसेस उपलब्ध नसल्याने एसटी महामंडळात मार्गस्थ बिघाड वाढले आहे.अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली,मुलचेरा रस्त्यावर नेहमीच बस मध्ये बिघाड होत असल्याने प्रवाश्यांना तडपत्या उन्हात भर रस्त्यावर उतरावे लागत आहे.सिरोंचा रस्त्यावर हा प्रमाण अधिकच बघायला मिळत आहे.सध्या या भागात अपघाताचे प्रमाण वाढले तर दुसरीकडे भंगार बस सेवेमुळे प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.प्रवाश्यांसाठी सुरक्षित समजला जाणारा एसटीचा प्रवास आता धोक्याचा झालं की काय अशी चर्चा सुरू आहे.रस्त्यावरील खड्डे,भंगार बस सेवा आणि अपघातांची सुरू असलेली शृंकला यामुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here