अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत रेपनपल्ली अंतर्गत येत असलेल्या ताटीगुडम येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा संचालक,कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ताटीगुडम येथे नाली बांधकाम आवश्यक असल्याची माहिती गावांतील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडलवार यांना दिली असता त्यांनी विभागाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून देण्यात आला.सदर बांधकामाचे भूमिपूजन माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावकऱ्यांनी कंकडालवार यांचे आभार मानले.
नाली बांधकाम भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,रेपणपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मी मडावी,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,ग्रामपंचायत सदस्य अशोक झाडे,ग्रामपंचायत सदस्य प्रणाली मडावी,कमलापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन ओल्लेटीवार,नरेंद्र गर्गम,सिताराम मडावी,नामदेव सिडाम,वासुदेव सिडाम,गंगाराम मडावी,रवींद्र अग्गु,संतोष सिडाम,विलास सिडाम,अभिषेक अग्गू,ग्रामपंचायत सदस्य हिंदुताई सिडाम,बकय्या चोधरी,जनार्धन सूंपुटम,साई तंगुला,श्रीकांत नालगुटावरसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.